मुंबई विद्यापीठ कुलगुरुपदी पुन्हा राजन वेळूकर

मुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त ठरलेले कुलगुरु राजन वेळूकर यांना पुन्हा आपला पदभार स्विकारण्यास संधी मिळाली आहे. राज्यपालांनी त्यांना आपल्या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आलेय.

Updated: Mar 5, 2015, 08:50 PM IST
मुंबई विद्यापीठ कुलगुरुपदी पुन्हा राजन वेळूकर  title=

नवी दिल्ली : मुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त ठरलेले कुलगुरु राजन वेळूकर यांना पुन्हा आपला पदभार स्विकारण्यास संधी मिळाली आहे. राज्यपालांनी त्यांना आपल्या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आलेय.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर वेळूकर यांना रुजू होण्यास सांगितले आहे. त्यामुळे वेळूकर पुन्हा आपला पदभार स्विकारण्यास मोकळे झाले आहेत.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर हे कुलगुरूपदासाठी पात्र नसल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवला होता. त्याचवेळी निवड समितीने वेळूकर यांची या पदावर चुकीच्या पद्धतीने निवड केल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले होते. त्यानंतर वेळूकर यांना हटविण्यात आले होते.

मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन प्र-कुलगुरू ए. डी. सावंत यांनी वेळूकर यांच्या निवडीला एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कुलगुरूपदावर बसणारी व्यक्ती संशोधक असावी. त्याने संशोधन प्रकल्प तडीस नेलेले असले पाहिजेत पण वेळूकर हे सर्वच पातळीवर निकषात न बसणारे आहेत. त्यांनी खोटी माहिती देऊन कुलगुरूपद पदरात पाडले. नियमात बसत नसतानाही निवड समितीने वेळूकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असा सावंत यांचा आक्षेप आहे. 

याबाबत सावंत यांनी राज्यपालांकडेही पत्र पाठवून आपला आक्षेप नोंदवला होता. वेळूकर यांच्याबाबतीत आपली फसवणूक करण्यात आल्याचे सांवत यांनी या पत्रात म्हटले होते.  दरम्यान, सावंत यांच्या याचिकेच्या अनुशंगाने समोर आलेल्या माहितीच्या आधारे  मुंबई उच्च न्यायालयाने वेळूकर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अपात्र असल्याचा निष्कर्ष काढला. त्यामुळे वेळूकर यांचे कुलगुरूपद अडचणीत आले  होते. त्यानंतर वेळूकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव  घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात दाद मागितली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नियुक्त करण्याचे आदेश दिलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.