प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई: एकेकाळी आपल्या गाण्यानं रूपेरी पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका मुबारक बेगम यांची प्रकृती सध्या खालावलीय. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या बेगमना सध्या प्रतीक्षा आहे ती मदतीच्या हातांची.
आपल्या दर्दभऱ्या गाण्यानं सिनेरसिकांचं काळीज चिरून टाकणारा हाच तो आवाज... मुबारक बेगम नावाच्या सूरसम्राज्ञीचा... १९४९ साली 'आईये' या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अल्पावधीतच त्यांनी रुपेरी पडदा गाजवला. अनेक अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला. सिनेमातल्या २०० हून अधिक गाण्यांना स्वरसाज चढवणारा हाच आवाज आता मात्र आर्त साद घालतोय ती मदतीची... ७५ वर्षांच्या बेगम सध्या जोगेश्वरीच्या वनरूम किचनमध्ये अंथरूणाला खिळून आहेत. श्वसनाचा त्रास, कमकुवत हृदय, मुलीचा मृत्यू अशा संकटांनी हतबल झालेल्या बेगमची आर्थिक परिस्थितीही नाजूकच आहे.
महाराष्ट्र सरकारकडून ७०० रूपयांची तुटपुंजी रक्कम मिळते, पण ती देखील नियमित नाही. त्यामुळं रूग्णालयाचा, औषधोपचारांचा खर्च कसा परवडणार? अशी चिंता त्यांच्या कुटुंबियांना सतावतेय.
मुबारक बेगम यांचं प्रसिद्ध कभी तनहायिमों हे गाणं-
मुबारक बेगम आणि त्यांच्या कुटुंबियांना गरज आहे ती मदतीच्या हातांची...
मुबारक बेगम
स्टेट बँक ऑफ इंडिया
जोगेश्वरी पश्चिम शाखा
अकाऊंट नंबर - 10279255298
IFSC कोड - SBIN0004626
MICR कोड - 400002038
GFX OUT
या क्रमांकावर तुम्ही मदतीचे धनादेश पाठवू शकता... हमारी याद आएगी... असं कधीकाळी रसिकांच्या काळजावर कोरून ठेवणाऱ्या मुबारक बेगम... रसिकांना त्यांची आठवण खरंच येईल का?
पाहा त्यांची सद्य परिस्थिती - व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.