मुंबई साखळी बॉम्बस्फोट, १३ पैकी १२ आरोपी दोषी

मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा निकाल आज लागला. विशेष मोका न्यायालयाने १३ पैकी १२ आरोपींना दोषी ठरवले आहे.

Updated: Sep 11, 2015, 05:58 PM IST
मुंबई साखळी बॉम्बस्फोट, १३ पैकी १२ आरोपी दोषी title=

मुंबई : मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा निकाल आज लागला. विशेष मोका न्यायालयाने १३ पैकी १२ आरोपींना दोषी ठरवले आहे.

या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तेरा जणांना अटक केली होती. नऊ वर्षांनंतर याचा निकाल आज जाहीर झाला. याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, १३ पैकी एक आरोपी निर्दोष सुटला आहे. अब्दुल शेख याच्याविरोधात ठोस पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने निर्दोष ठरविले.

दहशतवादी कारवाई करणे, हत्या, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्हांतर्गत १२ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. एक आठवडा निकाल वाचणयास लागेल. मात्र, आरोपींची संख्या बघता निकाल वाचण्यास एक आठवडांपैक्षा जास्त काळ लागण्याची शक्यता आहे. सोमवारपासून निकालाचे वाचण होणार आहे. 

मुंबईतील उपनगरीय पश्चिम रेल्वे गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात ११ जुलै २००६ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्बस्फोट खाररोड-सांताक्रुझ, वांद्रे-खाररोड, जोगेश्वरी-माहिम, मीरारोड-भार्इंदर, माटुंगा-माहिम व बोरीवली येथे झाले होते. 

याप्रकरणी अतिरेकीविरोधी पथकाने कमाल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी,शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, अब्दुल शेख, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान, असिफ खान या आरोपींना अटक केली होती.

या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले व याचा खटलाही सुरू झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१० मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवली. त्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर याचा खटला सुरू झाला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.