वडाळा येथे गोळीबार, छोटा राजन टोळीतील संबंधीत ठार

 वडाळा परिसर काल रात्री १० च्या सुमारास गोळीबाराच्या आवाजानं  हादरला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात सुमारे ४ राऊंड फायरींग झाले. या गोळीबारात १ ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Updated: Sep 11, 2015, 05:59 PM IST
वडाळा येथे गोळीबार, छोटा राजन टोळीतील संबंधीत ठार title=

मुंबई : वडाळा परिसर काल रात्री १० च्या सुमारास गोळीबाराच्या आवाजानं  हादरला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात सुमारे ४ राऊंड फायरींग झाले. या गोळीबारात १ ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

हा गोळीबार टोळी युद्धातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या फायरिंगमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन गँगशी संबंधित अर्जुन जयस्वाल याचा मृत्यू झालाय. तर त्याच्यावर फायरिंग करणारा आरोपी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

फरार आरोपी हा देखील छोटा राजन गँगशीच संबंधित असल्याचं समोर येत आहे. या शूटआऊट अॅट वडाळामध्ये एकाच गँगच्या दोघांनी एकमेकांवर का हल्ला केला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.