मुंबईत बारवर छापा, ५० तरूणींची सुटका

मुंबईत रात्री सहा बीअर बार आणि एका ब्युटी पार्लरवर छापा टाकण्यात आला. तेथून ५० मुलींची मुक्तता करण्यात आली आहे.

Updated: Jan 1, 2013, 07:39 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत रात्री सहा बीअर बार आणि एका ब्युटी पार्लरवर छापा टाकण्यात आला. तेथून ५० मुलींची मुक्तता करण्यात आली आहे.
पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ताडदेव येथील ग्रीन पार्क, घाटकोपर येथील विनस, कुर्ला येथील पूजा तर भायखळ येथील साईश्रद्धा बार छापा टाकला.
तसेच भोईवाडा येथील एका ब्युटी पार्लवरही छापा टाकून मुलींची सुटका करण्यात आली. ३१ डिसेंबरच्या निमित्तानं मुंबईत पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि पब सुरु होते. तशी परवानगी देण्यात आली होती.