मुंबई : मुंबई पोलिसांनी हिट अँड रन खटल्यात अभिनेता सलमान खानविरोधात गुन्हा नोंदवताना आपल्याकडून काही चुका झाल्या, अशी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. त्या वेळी ज्या चुका झाल्या, त्या भविष्यात टाळाव्यात यासाठी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
सन २००२ च्या या खटल्यात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना केलेल्या चुका आणि तपासातील त्रुटींवर बोट ठेवत उच्च न्यायालयाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती.
या राहिल्या त्रुटी?