मुंबई : सीमाप्रश्नावर आधारित 'मराठी टायगर्स' हा सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. मात्र हा सिनेमा बेळगावात प्रदर्शित करण्यास येथील कन्नड संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
कन्नड भाषिकांच्या भावना दुखावणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा बंद पाडण्याच्या वल्गना या संघटनांच्या नेत्यांनी केल्या आहेत. तसे निवेदनही त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलं आहे.
सिनेमात अमोल कोल्हे प्रमुख भूमिकेत असून आशिष विद्यार्थीही या सिनेमाव्दारे प्रथमच मराठी सिनेमात काम करतो आहे.
येळळूरमध्ये २५ जुलै २०१४ ला मराठी भाषिकांवर कानडी पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर हा सिनेमा आधारित आहे. ५ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.