मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनीही ललित मोदीची भेट घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारिया यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीला मदत केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया यांनंतर आता राकेश मारिया यांचं नाव चर्चेत आलं आहे.
लंडनमध्ये एका परिषदेसाठी गेले असता राकेश मारिया यांनी ललित मोदीची भेट घेतली होती. मारिया यांनीच हे आधी जाहीर केलं होतं.
ललित मोदींच्या जीवाला धोका असल्याने तुम्ही त्यांची भेट घ्या अशी विनंती ललित मोदींच्या वकिलाने जुलै २०१४ मध्ये केल्यामुळे मी त्यांची भेट घेतली होती.
तसेच, त्यांनी मुंबईत येऊन तक्रार नोंदवावी, असा सल्ला आपण ललित मोदीला दिला होता, असे मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.