मुंबई पालिका रुग्णालयात ४५० बेडस् वाढविणार

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) मुंबईकरांसाठी दसरा भेट दिलीय. केईएम, सायन आणि नायर या तिन्ही मोठ्या रूग्णालयात प्रत्येकी ४५० बेडस् वाढण्यात येणार आहेत. 

Updated: Oct 23, 2015, 05:46 PM IST
मुंबई पालिका रुग्णालयात ४५० बेडस् वाढविणार title=

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) मुंबईकरांसाठी दसरा भेट दिलीय. केईएम, सायन आणि नायर या तिन्ही मोठ्या रूग्णालयात प्रत्येकी ४५० बेडस् वाढण्यात येणार आहेत. 

तिन्ही रूग्णालयात एकूण १३५० बेडस् वाढविण्यास प्रशासकीय मंजूरी मिळालीय. मुंबईत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 

या निर्णयामुळे केईएममध्ये १७५० वरून २२०० बेडस् तर सायनमध्ये बेड्सची संख्या १४५० वरून १९०० होणार असून नायरमध्ये १४०० वरून १८०० बेडस् होणार आहेत. यामुळे सरकारी रुग्णालयात उपचार घेण्या-या रुग्णांना दिलासा मिळेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.