मुंबईकरांसाठी बँड न्यूज, मेट्रोच्या पास दरात वाढ

मुंबईतल्या मेट्रोची पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.

Updated: Nov 27, 2015, 09:03 PM IST
मुंबईकरांसाठी बँड न्यूज, मेट्रोच्या पास दरात वाढ  title=

मुंबई : मुंबईतल्या मेट्रोची पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.

मेट्रोचा 675 रूपयांच्या मासिक पासचे दर आता 725 रूपयांवर गेले असून 900 रूपयांचा मासिक पास 950 रुपयांवर गेला आहे. 

मेट्रोच्या एकेरी प्रवासाचं किमान तिकीट 10 रुपयेच राहणार आहे. पूर्वीच्या चार टप्प्यांऐवजी आता पाच टप्पे करण्यात आले आहेत. 

मेट्रोच्या एकेरी प्रवासाचे तिकीट या पाच टप्प्यांत 10, 20, 25, 35, आणि 45 रुपये असे असणार आहे. नवीन दरवाढ एक डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.