मुंबई महापौरांचा ‘नृत्याविष्कार’ झी मीडियावर

 बुधवारी महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये महापौर स्नेहल आंबेकर यांनी स्टेजवर नृत्याचा आनंद लुटला... त्यांच्या पतीनंही त्यांनी उत्तम साथ दिली... कार्यक्रम सुरू असताना आंबेकरांनी धरलेला ठेका पाहून निवेदिकेनं त्यांना आमंत्रित केलं आणि त्यादेखील कोणतीच भीडभाड न ठेवता स्टेजवर थिरकतच आल्या...

Updated: Oct 24, 2014, 04:38 PM IST
मुंबई महापौरांचा ‘नृत्याविष्कार’ झी मीडियावर title=
Exclusive - photo

मुंबई : बुधवारी महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये महापौर स्नेहल आंबेकर यांनी स्टेजवर नृत्याचा आनंद लुटला... त्यांच्या पतीनंही त्यांनी उत्तम साथ दिली... कार्यक्रम सुरू असताना आंबेकरांनी धरलेला ठेका पाहून निवेदिकेनं त्यांना आमंत्रित केलं आणि त्यादेखील कोणतीच भीडभाड न ठेवता स्टेजवर थिरकतच आल्या...

बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचणाऱ्या महापौरांना बघून काही अधिकारी आणि शिवसेना पदाधिका-यांना मात्र धडकी भरली... हा मीडियामध्ये चेष्टेचा विषय होऊ शकतो, याची कल्पना त्यांना आलीच असणार... त्यामुळेच मग पालिकेच्या फोटोग्राफरला त्यांच्या नृत्याचे फोटो तातडीनं डिलीट करायला लावण्यात आले... मात्र हे काही फोटो झी मीडियाच्या हाती लागलेत... 

महापौर स्नेहल आंबेकर यांनी  छुप गये सारे... या गाण्यावर नृत्य केले. पण त्यांच्यावर टीका होत आहे. पण ओबामा आणि त्यांची पत्नी मुंबई येऊन कोळी नृत्य करू शकते, पंतप्रधान मोदी जपानमध्ये जाऊन ड्रम वाजू शकतात. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणाऱ्या या देशात महिला महापौरांनी नृत्य केले तर विनाकारण गजहब माजवला जात असल्याची प्रतिक्रिया सामान्यांतून उमटत आहे. 

दरम्यान, मी जे काही केले ते गैर नाही, एक व्यक्ती म्हणून मला जे योग्य वाटले ते केले, असे स्नेहल आंबेकर यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.