मुंबई: आजपासून बेस्ट बसचा प्रवास महागलाय. बेस्टचा प्रवास एक रुपयानं महागलाय. किमान भाड्यात १ रुपया इतकी भाडेवाढ करण्यात आलीय. एकूण दोन टप्प्यांत बेस्ट प्रवासात भाडेवाढ होतेय. पहिली भाडेवाढ आजपासूनच होतेय. तर एक एप्रिलला पुन्हा एकदा एका रुपयानं भाडेवाढ केली जाणार आहे.
दरम्यान, बेस्टनं मुंबई- ठाणे यादरम्यानच्या जुन्या वातानुकूलित सेवेचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं असून इस्टर्न फ्री वेवरून मंत्रालय ते ठाणेदरम्यानची सेवाही आजपासून सुरू होत आहे. या सोबतच बेस्टनं नऊ मार्गावरील सेवाही बंद केल्या असून त्यात वडाळा-कळंबोली मार्गावरील वातानुकूलित सेवेचा समावेश आहे. तिकीट दरवाढीसह मासिक पास आणि विद्यार्थ्यांच्या पासमध्येही वाढ होत आहे.
नेमकी ही भाडेवाढ कशी आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून...
अंतर (किमी) | आताचे दर | १ फेब्रुवारी | १ एप्रिल |
२ | ६ | ७ | ८ |
३ | ८ | १० | १० |
६ | १२ | १३ | १४ |
१० | १५ | १६ | १८ |
१५ | १८ | २० | २२ |
२० | २० | २५ | २६ |
बस पास (रुपये)
अंतर | मासिक | त्रैमासिक |
२ किमी | ३०० | ८५० |
४ किमी | ४५० | १२०० |
६ किमी | ५९० | १७०० |
*चार किमीचे *पहिल्या टप्प्यातील
प्रवास भाडे : ७ रुपये
बसभाडे : १० रुपये
*६० टक्क्यांहून अधिक प्रवाशांना भाडेवाढीची झळ
मुंबई-ठाणे एसी बस : पूर्व मुक्त मार्गावरून
ए ८ ही जलद सेवा
कुठून?
*लोढा पॅराडाइजवरून: सकाळी ८.१५
*हिरानंदानी इस्टेटवरून: सकाळी ८.३०
*प्रवास: बॅकबे आगारापर्यंत
परतीच्या वेळा
बॅकबे वरून :
सायं. ५.४५ (लोढा पॅराडाइजसाठी), सायं. ६.१५ (हिरानंदानी इस्टेटसाठी)
या सेवा बंद
*वडाळा-कळंबोली दरम्यानची एएस ५०३. '३८, ९१,
४१४, ४८३, ५२० मर्या, ६१७, सी ५२ जलद हे मार्ग
*वडाळा आगार ते बोरिवलीदरम्यानची ४४० क्रमांकाची
सेवा रविवारी बंद
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.