' भाजपाला योग्य वेळी उत्तर देऊ' - उद्धव ठाकरे

 'त्यांना जे बोलायचंय ते बोलू , योग्य वेळ आल्यावर मी त्यावर उत्तर देईन' असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला.  

Updated: Jan 31, 2015, 07:53 PM IST
' भाजपाला योग्य वेळी उत्तर देऊ' - उद्धव ठाकरे title=

मुंबई :  'त्यांना जे बोलायचंय ते बोलू , योग्य वेळ आल्यावर मी त्यावर उत्तर देईन' असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला.  

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सामना या सेनेच्या मुखपत्रातून केलेला टीकेचा वार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुल्लेखाने परतून लावला यावर उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिलाय.

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दोघेही विदर्भाचे असतानाही, तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला होता. त्यावर 'वर्तमानपत्रातून कोणी काही वक्तव्य केले म्हणजे अणुबॉम्ब पडला असे नव्हे',  असे सूचक वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी करत सेनेला टोला लगावला होता. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडेंनेही पलटवार केल्याने युतीतील धुसफूस वाढताना दिसत होती.

यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तर देणे उद्धव ठाकरे यांनी टाळले, मात्र योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच, असा इशाराही त्यांनी दिलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.