मुंबई हायकोर्टानं ठाणे महापालिकेला फटकारलं

रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे. जर महापालिका हे काम करणार नसेल तर कोण करणार अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं ठाणे महापालिकेला फटकारलंय. 

Updated: Nov 21, 2016, 08:42 PM IST
मुंबई हायकोर्टानं ठाणे महापालिकेला फटकारलं title=

मुंबई : रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे. जर महापालिका हे काम करणार नसेल तर कोण करणार अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं ठाणे महापालिकेला फटकारलंय. 

ठाणे पश्चिम स्टेशनबाहेर अनेक दुकानदारांनी आपली दुकानं आपल्या जागेपेक्षा जास्त जागा व्यापत अतिक्रमण केलं असल्याने स्टेशनबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना चालताना त्रास सहन करावा लागतो, अशी जनहित याचिका विक्रांत तावडे यांनी हायकोर्टात दाखल केलीय. त्यावर मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि एम.एस. सोनक यांच्या खंडापीठानं ठाणे महापालिकेवर ताशेरे ओढलेत. 

अतिक्रमण काढण्याची जुजबी कारवाई होते मग पुन्हा जैसे थे परिस्थिती होते याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल ठाणे मनपानं चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत.