मुंबई : जु्न्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांवर घातलेल्या बंदीच्या आदेशांमध्ये विसंगती असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. केंद्र सरकारचा 8 आणि 9 नोव्हेंबरचा आदेश आणि 14 नोव्हेंबरच्या आरबीआयच्या आदेशात प्रथमदर्शनी अस्पष्टता आणि विसंगती असल्याचं दिसून येत असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे.
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारू नका असे आदेश आरबीआयने दिले. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर घेतलेल्या आजच्या सुनावणीत न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलंय. यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.