www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पहिल्या तरंगतं हॉटेल पाहायला मिळतंय. वांद्रे-वरळी सी लिंकच्याजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यावर हे तीन मजली हॉटेल बनलंय.
दोन अलिशान रेस्तराँ असलेली चिनी बनावटीची यॉट 'ए.बी. सेलेस्टीयल' वांद्रे समुद्रात दाखल झालेली दिसतेय. १५ ऑगस्टपासून हे हॉटेल पर्यटकांच्या सेवेत दाखल होतंय. महाराष्ट्र पर्यटन विभाग, डब्ल्यु बी इंटरनॅशनल कन्सल्टंटस् तसंच ए बी हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त भागीदारीतून हे हॉटेल उभारण्यात आलंय. बुधवारी, राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलंय. या तरंगत्या हॉटेलचा दहा टक्के महसूल एमटीडीसीला आहे. सुमारे 650 पर्यटक एकाच वेळी या हॉटेलचा आनंद उपभोगू शकतात.मटीडीसीने हे हॉटेल चालवण्यासाठी अकरा परवागन्या घेतल्या आहेत. यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं विविध उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.
तुम्हीच पाहा कसं आहे हे तरंगतं हॉटेल….
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.