मुंबई विकास आराखडा | अंतिम अहवाल महापौरांसमोर सादर

मुंबईच्या विकास आराखड्याचा अंतिम अहवाल मुंबई महापालिकेत महापौरांसमोर सादर करण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 6, 2017, 10:08 PM IST
 मुंबई विकास आराखडा | अंतिम अहवाल महापौरांसमोर सादर  title=

मुंबई : मुंबईच्या विकास आराखड्याचा अंतिम अहवाल मुंबई महापालिकेत महापौरांसमोर सादर करण्यात आला. मुंबईचा 2034 सालापर्यंतचा विकास प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय.

हा अहवाल आता आयुक्तांकडे जाईल. त्यानंतर तो महापालिका सभागृहात सादर करण्यात येईल. सभागृहात या अहवालावर चर्चा होईल. 

पालिका सभागृहात आराखडा मंजूर केल्यानंतर हा अहवाल नगरविकास खात्याकडे अंतिम मंजुरीसाठी जाईल. या आराखड्यात आरेचं क्षेत्र हे ना विकास क्षेत्र बदलून हरीत क्षेत्र करण्यात आलं आहे. तसंच मेट्रो कारशेडचं आरक्षण तिथे ठेवण्यात आलं आहे.