पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी

आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी घेऊन आले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 6, 2017, 09:02 PM IST
पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी title=

मुंबई : राज्यातल्या बैलागाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा, अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी घेऊन आले.

गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांनी राज्यसरकार व केंद्र सरकारकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. 

तामिळनाडूमधील जलीकटटू स्पर्धेला विधानसभेत कायदा संमत करून परवानगी देण्यात आली. तेथील लोकभावनेचा आदर करून तामिळनाडू सरकारने कायद्यात बदल केला. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करावी. 

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी लावून धरली आहे.