मुंबई : छोटा राजनला मुंबईत आणणार असल्याची माहिती आज खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलीय. राजनच्या सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवणार असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्षष्ट केलंय. राजनला आर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या अंडा सेलमध्ये राजनला ठेवण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
अधिक वाचा - छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ
अधिक वाचा - काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा
इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक करण्यात आलेल्या छोटा राजनला भारतात आणल्यानंतर कुठे ठेवण्यात यावं? यावर सल्लामसलत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई पोलीस आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर, छोटा राजनला अंडा सेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
आणखी वाचा - काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती
उल्लेखनीय म्हणजे, दाऊदशी काही मुंबई पोलीसांचे लागेबांधे असून ते दाऊदसाठी काम करतात, असा दावा छोटा राजननं केलाय. सोबतच मुंबई पोलिसांकडून आपल्याला धोका असल्याचा दावाही छोटा राजन करतोय. परंतु, राजनचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत असलेलं शत्रूत्व लक्षात घेता, त्याला या अंडा सेलमध्ये आणणं योग्य ठरेल असं मुंबई पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.