आईच्या मदतीनं सावत्र बापानंच काढला मुलाचा काटा...

नात्यांतीप गुंतागुंत वाढल्याची परिणीती एका मुलाच्या जीवावर बेतलीय. ही घटना मुंबईतल्या चेंबूर भागात घडलीय. दुसरं लग्न केलं म्हणून आईला त्रास देणाऱ्या मुलाचा आई आणि सावत्र बापानंच काटा काढल्याचं उघड झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 28, 2013, 04:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नात्यांतीप गुंतागुंत वाढल्याची परिणीती एका मुलाच्या जीवावर बेतलीय. ही घटना मुंबईतल्या चेंबूर भागात घडलीय. दुसरं लग्न केलं म्हणून आईला त्रास देणाऱ्या मुलाचा आई आणि सावत्र बापानंच काटा काढल्याचं उघड झालंय. महत्त्वाचं म्हणजे हा सावत्र बाप मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर कार्यरत होता.
चेंबूरमध्ये राहणाऱ्या रोहन झोडगे या अवघ्या २५ वर्षांच्या मुलाचा सावत्र बापानं म्हणजेच शिवाजी नरवणे यानं हत्या केल्याची कबुली आई नंदा झोडगे हिनं दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रोहन हा आई नंद, लहान भाऊ आणि बहिणीसह चेंबूरमध्ये राहत होता. आई नंदा हिनं रोहनच्या वडिलांना २००९ साली सोडलं होतं. त्यानंतर तिनं शिवाजी नरवणे याच्याशी विवाह करत होता. याला तरुण रोहनचा विरोध होता.
आईच्या दुसऱ्या लग्नाने संतापलेल्या रोहनने यानंतर आईला आणि सावत्र बापाला त्रास द्यायला सुरुवात केली होती. चेंबूरमधील दोन घरांपैकी एक आपल्या नावावर करावे असा तगादाही त्याने लावला होता. त्यामुळेच रोहनचा काटा काढण्याचा निर्णय नंदा आणि शिवाजी नरवणे या दोघांनी घेतला. गुरुवारी रात्री नंदा दोन्ही मुलांना घेऊन परिसरातच राहणाऱ्या भावाच्या घरी झोपण्यासाठी गेल्या. रोहन घरीच थांबला. त्यावेळी शिवाजी नरवणे यांनी रोहनची चाकूचे वार करून हत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला आई नंदाला ताब्यात घेतल्यानंतर तिनं या कृत्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी नंदासह एसीपी शिवाजी नरवणे यालाही शनिवारी अटक केली. त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सध्या सुरक्षा व संरक्षण विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या शिवाजी नरवणे १९८३ मध्ये मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर रूजू झाला होता. मुंबई व ठाण्यात त्यानं पोलीस निरीक्षक म्हणून काम केलं होतं

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.