मुंबईत सर्वाधिक ध्वनीप्रदूषण, दिल्ली चौथ्या स्थानी

ऑड-ईव्हन फॉर्म्युल्याचा प्रयोग सुरु असलेल्या दिल्लीमध्ये वायूप्रदूषण जास्त असले तरी आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक ध्वनिप्रदूषण असल्याचे आढळून आलेय. 

Updated: Apr 26, 2016, 08:25 AM IST
मुंबईत सर्वाधिक ध्वनीप्रदूषण, दिल्ली चौथ्या स्थानी title=

मुंबई : ऑड-ईव्हन फॉर्म्युल्याचा प्रयोग सुरु असलेल्या दिल्लीमध्ये वायूप्रदूषण जास्त असले तरी आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक ध्वनिप्रदूषण असल्याचे आढळून आलेय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या(सीपीसीबी) माहितीनुसार सर्वाधिक ध्वनिप्रदूषण असलेल्या शहरांमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर आहे.

दुसऱ्या स्थानावर लखनऊ आणि तिसऱ्या हैदराबाद. यानंतर चौथ्या स्थानी राजधानी दिल्लीचा नंबर लागतो. मोटारी, जनरेटर सेट्स, एअरक्राऱफ्टस आणि कारखान्यांमुळे ध्वनिप्रदूषण निर्माण होते. सीपीसीबीच्या मते दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलहून अधिक आवाज असल्यास यामुळे हायपरटेन्शन, बहिरेपणा, अनिद्रा यांसारख्या रोगांचा जन्म होतो. 

प्रदूषणाची तीव्रता सात शहरांतील ३५ विविध ठिकाणी मोजली जाते. सीपीसीबी आता १८ राज्यांतील १६० विविध ठिकाणी मॉनिटरिंग करण्याच्या विचारात आहे.