www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोनिका मोरेला गुरवारपर्यंत विशेष मदत दिली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करावं लागेल, असा इशारा मनसे दिला आहे.
मनसे नेते आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली, यात मनसे नेत्यांनी अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिकाला विशेष मदत द्यावी अशी मागणी केली. मात्र सेन्ट्रेल रेल्वेचे जनरल मॅनेजर एस के सुद यांनी आपल्या हातात हे अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.
मोनिका मोरे अपघात प्रकरण रेल्वेने हाताळावं असंही मनसेने म्हटलं आहे, मात्र यावरही रेल्वे अधिकाऱ्यांकडून होकार आलेला नाही. यानंतर गुरूवारपर्यंत रेल्वेने मोनिका मोरेला मदत केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे.
या बैठकीला मनसे कार्यकर्त्यांसह मनसे उपाध्यक्ष शालिनी ठाकरे, मनसे कामगार अध्यक्ष मनोज चव्हाण आणि नेत्या रिटा गुप्ताही उपस्थित होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.