मुंबई : मनसेनं भाजप आमदार राज पुरोहित यांच्या काळबादेवीतल्या ऑफिसवर हल्लाबोल केलाय. राज पुरोहित यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख बोगस नेता असा केला होता. पुरोहित यांच्या या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
राज पुरोहित यांच्या स्टिंगमुळं भाजपच्या गोटात खळबळ माजली असताना, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. राज पुरोहित हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. या व्हिडिओची वैधता तपासून पुढील कारवाई करण्यात येईल, असं शेलार यांनी सांगितलंय.
दरम्यान, राज पुरोहित यांच्या स्टिंगमुळं भाजपवर हल्लाबोल करण्याचं आयतं कोलीत विरोधकांच्या हाती सापडलंय. ही राज की बात नसून मन की बात असल्याची टीका काँग्रेसनं भाजपवर केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.