...तर त्याची तातडीनं पदावरून हकालपट्टी - बाळा नांदगावकर

 पक्षाच्या बैठकीतल्या चर्चेच्या बातम्या मीडियापर्यंत पोहचतातच कशा ? असा संताप व्यक्त करीत, बातमी फोडणारा यापुढे पक्षातलाच कुणी असेल, तर त्याची तातडीनं पदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची घोषणा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज केली. 

Updated: Apr 22, 2017, 06:37 PM IST
...तर त्याची तातडीनं पदावरून हकालपट्टी - बाळा नांदगावकर title=

मुंबई :  पक्षाच्या बैठकीतल्या चर्चेच्या बातम्या मीडियापर्यंत पोहचतातच कशा ? असा संताप व्यक्त करीत, बातमी फोडणारा यापुढे पक्षातलाच कुणी असेल, तर त्याची तातडीनं पदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची घोषणा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज केली. 

तसा ठरावच आज पक्षाच्या नेत्यांनी बैठकीत एकमताने मंजूर केलाय. तसेच गुरुवारी 'कृष्णकुंज' वर झालेल्या बैठकीत राज ठाकरे विरुद्ध नेते, सरचिटणीस खडाजँगी  या बातमीचेही नांदगावकर यांनी खंडन केलय. 

पक्षात नेते-सरचिटणीस यांच्यात फेरबदलाची मागणी प्रवक्ते संदीप देशपांडे आणि उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे केलीय. त्यावर फेरबद्लाचा अंतिम निर्णय राज ठाकरे यांचाच असल्याची पुस्ती नांदगावकर यांनी जोडलीय. तर लवकरच राज ठाकरे मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघात मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्याशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.