मनसे पुन्हा आक्रमक, त्या कार्यक्रमाविरोधात कलर्सला पत्र

राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे.

Updated: Feb 26, 2017, 10:34 PM IST
मनसे पुन्हा आक्रमक, त्या कार्यक्रमाविरोधात कलर्सला पत्र title=

मुंबई : राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे. कलर्सवरच्या एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान एकत्र नाचणार असण्याची माहिती मनसेला मिळाली होती. यावर मनसेनं आक्षेप घेतला आहे. हा कार्यक्रम प्रसारित केला जाऊ नये असं पत्र मनसेकडून कलर्स मराठीच्या प्रमुखांना देण्यात आलं आहे.