टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!

टोल नाक्यांमुळे वेठीस धरलेल्या मुंबईकरांच्या मदतीला आता मास्टर ब्लास्टर धाऊन आलाय. राज्यसभा खासदार असलेल्या सचिननं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीचं पत्र लिहिलंय. यामुळे राज्यातला टोलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Updated: Mar 13, 2015, 01:31 PM IST
टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून! title=

मुंबई : टोल नाक्यांमुळे वेठीस धरलेल्या मुंबईकरांच्या मदतीला आता मास्टर ब्लास्टर धाऊन आलाय. राज्यसभा खासदार असलेल्या सचिननं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीचं पत्र लिहिलंय. यामुळे राज्यातला टोलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

मुंबईकरांना टोलनाक्यामुळे शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागतो. त्यामुळे या प्रक्रियेचा फेरविचार करुन तमाम मुंबईकरांचा हा त्रास कमी करावा, अशी अपेक्षा सचिननं व्यक्त केलीये. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या प्रश्नावर इतक्या जाहीरपणे आणि निर्णायकपणे सचिननं आपली भूमिका मांडलीय.

गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्यांचा विषय गाजतोय. पण आता खुद्द सचिननंच  लोकांच्या आवाजात आपला आवाज उठवल्यानं सरकार या प्रश्नाकडे गांभिर्यानं लक्ष देईल अशी अपेक्षा आहे. 

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया... 
दरम्यान, वाढत्या टोलला आघाडी सरकार कारणीभूत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सचिननं पत्रात नमूद केलेल्या विषयांबाबत अभ्यास सुरु असून टोलबाबत नवीन सिस्टीम सुरु करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 

तर टोलच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारवर तोफ डागलीय. टोलमुक्त महाराष्ट्र दूरच असल्याची टीका नितेश राणे यांनी केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.