मुंबई : मुंबई महापालिका अभियंत्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकप्रकरणी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांनी अखेर शरणागती पत्करली आहे. दोघंही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर झालेत. पोलीस स्टेशनमध्ये हजर होताच पोलिसांनी दोघांनाही अटक केलीय.
यावेळी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनबाहेर जमा झालेत. दोन्ही नगरसेवकांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस स्टेशनमध्ये या दोघांसोबत माजी आमदार नितीन सरदेसाई हजर आहेत.
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासंदर्भात महापलिका आणि राज्य सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोवर जामीन घेणार नसल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतली आहे.