महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस

 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज वचननामा जाहीर केला, यात मुंबई आणि ठाणेकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2017, 03:50 PM IST
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस title=

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज वचननामा जाहीर केला, यात मुंबई आणि ठाणेकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ५०० ते ७०० चौरस फुटांच्या आत घरांना मालमत्ता करातून सूट देण्यात येणार आहे. तसेच युतीविषयी अजून कोणताही ठाम निर्णय झाला नसल्याचं यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

  • ५००ते ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट देणार

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना, ही मुंबईकरांसोबतच ठाणे, उल्हासनगरसाठीही लागू करणार

  • पाणी, रस्ते या मुलभूत सुविधा आणखी दर्जेदारपणे पुरवल्या जातील

  • मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा सत्तेत आल्यानंतर ‘बेस्ट’ बसचा प्रवास मोफत करता येणार

  • ठाण्यात कोळशेतला ३० एकरावर भव्य सेंट्रल पार्क उभारलं जाणार

  • स्वच्छता करातून व्यापाऱ्यांची मुक्तता करणार

  • खारेगाव चौपाटी सिंगापूरच्या धर्तीवर अत्याधुनिक आंतराष्ट्रीय पातळीवरची चौपाटी केली जाईल 

  • घोडबंदरला मोठं स्टेडियम बांधण्यात येईल.

  • सत्तेत आल्यानंतर कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडणार, यासाठी जलवाहतुकीचा प्रकल्प ठाणे महापालिका प्राधान्याने सुरु करणार