लज्जास्पद: अमेरिकन महिलेसमोर भरदिवसा रस्त्यावर यानं केलं हस्तमैथुन

मुंबईत भरदिवसा एक लज्जास्पद घटना घडलीय. एका अमेरिकन महिलेसमोर ज्यांचं नाव मर्यान्ना एबडो आहे यांच्यासमोर आलेल्या एका पुरुषानं भरदिवसा हस्तमैथुन केलं. 

Updated: Aug 18, 2015, 04:17 PM IST
लज्जास्पद: अमेरिकन महिलेसमोर भरदिवसा रस्त्यावर यानं केलं हस्तमैथुन title=

मुंबई: मुंबईत भरदिवसा एक लज्जास्पद घटना घडलीय. एका अमेरिकन महिलेसमोर ज्यांचं नाव मर्यान्ना एबडो आहे यांच्यासमोर आलेल्या एका पुरुषानं भरदिवसा हस्तमैथुन केलं. 

मर्यान्ना एबडो यांनी त्या पुरुषाचा फोटो काढून तो ट्विटरवर टाकला. त्यात मर्यान्ना यांनी लिहिलंय की, सकाळी जवळपास 7 वाजून 50 मिनीटांनी हा व्यक्ती मला पाहून हस्तमैथुन करू लागला.

मर्यान्ना यांनी पुढे लिहिलं, यापूर्वी हा व्यक्ती फरार होईल, त्याचा फोटो काढला. लोकांना ट्विटरवरून या घटनेबाबत सांगत मर्यान्ना यांनी जास्तीतजास्त ही पोस्ट रिट्विट करण्याची मागणी केली.

मर्यान्ना या एक लेखिका आहेत. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर हा फोटो खूप रिट्विट झाला आणि सोशल मीडियावर वायरल झाला. या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांच्या कार्यालयानंही दखल घेत ट्विट केलं. ट्विटमध्ये लिहिलं होतं, "मर्यान्ना यांच्या या केसबद्दल जॉईंट सीपी देवेन भारती संपूर्ण लक्ष ठेवून आहेत." 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.