www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे विवाहित महिलांना अनुकंपा तत्वावर आता नोकरी मिळणार आहे. पुण्याच्या स्वरा कुळकर्णी यांनी राज्य सरकारच्या १९९४ च्या जी आरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हा आदेश दिलाय. १९९४ जी आर नुसार अविवाहित मुलालाच अनुकंपा तत्वावर आई किंवा वडीलांच्या जागी नोकरी मिळत होती. पण, आता कोर्टाच्या या निर्णयामुळे विवाहित महिलेलाही आपल्या आई वडीलांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते.
पण हा आदेश देताना कोर्टानं एक महत्वपूर्ण अट ठेवलीय. त्यासाठी आई - किंवा वडील यांच्या निधनाच्या पश्च्यात आई आणि वडीलांची काळजी घेणार असेल त्यांचा सांभाळ करणार, अशी हमी दिल्यानंतरचं मुलीला विवाह झाल्यानंतरही अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.