मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारनंच वेळ वाढवून मागितला. पण मुख्यमंत्री मात्र चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करत असल्याचं राणेंनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतं, तर सरकारने नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही?, आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्याविरोधात आम्ही अविश्वास ठराव आणणार आहोत. भाजपामध्ये गुंडाना प्रवेश दिला जातोय. मुख्यमंत्री १४ भ्रष्ट मंत्र्यासंह सरकार चालवत आहेत. एकाद्या मंत्र्यावर आरोप झाले की मुख्यमंत्री त्यांना क्लिनचीट देतात, हे कसं काय चालते?
16:28 PM
मुंबई : अविश्वास ठराव आणणार, सरकार आणि CM खोट बोलत आहेत : राणे
16:27 PM
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी 34 टक्के मराठा समाजाची चेष्टा आणि दिशाभूल केली आहे : राणे
16:27 PM
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, हिवाळी अधिवेशनात हक्कभंग आणणार : राणे
16:26 PM
मुंबई : शासनाने वेळ वाढवून मागितल्याची न्यायालयाची प्रत नारायण राणेंनी सादर केली
16:25 PM
मुंबई : मुख्यमंत्री म्हणतात न्यायालयाकडे आम्ही वेळ मागितला नाही, पण सरकारनेच वेळ वाढवून मागितला : राणे
16:25 PM
मुंबई : मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेची दिशाभूल करत आहेत : राणे
16:24 PM
मुंबई : मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करत आहेत : नारायण राणे