आता महावितरण घेणार बिलापोटी जुन्या 500, 1000च्या नोटा

महावितरण 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार आहे. तसेच सुट्टीतही राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. 

Updated: Nov 12, 2016, 11:11 PM IST
आता महावितरण घेणार बिलापोटी जुन्या 500, 1000च्या नोटा title=

मुंबई : महावितरण 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार आहे. तसेच सुट्टीतही राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. 

जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून वैयक्तिक आणि घरगुती वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी जुन्या 500 व 1000च्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे.

सोमवार 14 नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक सुटी असली तरी महावितरणने राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहे. ही सर्व भरणा केंद्रे दि. 12 व 13 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत तसेच दि. 14 नोव्हेंबरला सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. 

ग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.