मुंबई : शुक्रवारी विरोधी पक्षांच्या गोंधळातच 2016-17 या आर्थिक वर्षाचा सर्वेक्षण अहवाल विधीमंडळात सादर करण्यात आला.
राज्याच्या दरडोई उत्पन्न आणि कृषी उत्पन्नात वाढ झालीय. पण वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत असल्याचं स्पष्ट दिसतंय. राज्याच्या स्थूल उत्पन्नात तब्बल 9 टक्क्यांची वाढ झाल्याचं सर्वेक्षण दाखवण्यात आलंय. रब्बी हंगामात उत्पादनात विक्रमी वाढ झाली.
यात अनेक बाबींमध्ये दिलासादायक चित्र असलं तरी काही बाबी गंभीर आहेत. राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची गती मंदावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जलयुक्त शिवार योजनेवर झालेला खर्च अतिशय कमी आहे. या वर्षी मंजूर झालेल्या 1400 कोटींपैकी फक्त 85 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केल्याचं सर्वेक्षणातून पुढं आलंय.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. कर्जमुक्ती व्हावी अशी आमची दोघांचीही इच्छा आहे... पण त्यासाठी योग्य तो मार्ग शोधावा लागेल, तसंच अर्थसंकल्प मांडताना विरोधक सहकार्य करतील, अशी आशाही मुनगंटीवारांनी आशा व्यक्त केली.