शुभा राऊळ मनसेत दाखल, दहिसरमधून उमेदवारी जाहीर

शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.  मनसेकडून त्यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दहिसरमध्ये सेनेचे विनोद घोसाळकर यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता अधिक आहे.

Updated: Sep 27, 2014, 09:02 AM IST
शुभा राऊळ मनसेत दाखल, दहिसरमधून उमेदवारी जाहीर title=

मुंबई : शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.  मनसेकडून त्यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दहिसरमध्ये सेनेचे विनोद घोसाळकर यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता अधिक आहे.

 दहिसर प्रभागात सर्वाधीक महिला उमेदवार असल्यानं त्यांनी शिवसेनेकडे या प्रभागासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली म्हणूनही त्या नाराज होत्या.  शिवाय घोसाळकर प्रकरणामुळे शिवसेनेत न्याय मिळाला नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.

शिवसेनेचे आमदार घोसाळकर हे शिवसेनेच्याच नगरसेविकांच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप शुभा राऊळ यांनी केली होता. पक्षाच्या नेतृत्वानंही त्यांच्या या कैफियतीकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. तेव्हापासून त्या नाराज होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.