लंडन ट्युबच्या मोटरमननी पुकारला संप, लंडनला आलं मुंबईचं रुप

सोमवारी सकाळी कामावर निघालेल्या लंडनवासियांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. लंडनची जीवन वाहिनी असणाऱ्या ट्युबच्या मोटरमननी अचानक 24 तासांचा संप पुकारला आणि लंडनला मुंबईचं स्वरुप आलं.

Updated: Jan 10, 2017, 12:50 PM IST
लंडन ट्युबच्या मोटरमननी पुकारला संप, लंडनला आलं मुंबईचं रुप title=

लंडन : सोमवारी सकाळी कामावर निघालेल्या लंडनवासियांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. लंडनची जीवन वाहिनी असणाऱ्या ट्युबच्या मोटरमननी अचानक 24 तासांचा संप पुकारला आणि लंडनला मुंबईचं स्वरुप आलं.

खचाखच भरललेल्या बसेस आणि रस्त्यांवरून चालणारे लाखो प्रवासी असं दृश्यंच साऱ्या लंडनभर बघायला मिळालं. लंडनच्या ट्यूबमुळे तब्बल 48 लाख लोक दररोज प्रवास करतात. सगळ्या सेवा अचानक ठप्प झाल्यानं सगळेच अचानक रस्त्यावर आले. लंडनला जणू मुंबईचं स्वरुप आलं. दक्षिण मुंबईतल्या ब्रिटीश कालीन इमारतींच्या बाजूनं जाणाऱ्या खचाखच भरलेल्या बसेस आपण नेहमीच बघत असतो. सोमवारी लंडनच्या रस्त्यावरून धावणाऱ्या बसेसचं दृश्य बघून मोठं साम्य बघायला मिळलं.