www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
होळी आणि धूलीवंदन आनंदात आणि रंग उधळून साजरा करायाचा अशी सगळ्यांची भावना असेल. दुसरीकडे या सणाच्या वेळी रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांवर फुगे मारून आणि रंग फेकून प्रवाशांना जखमी देखील केलं जातं. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी कंबर कसलीये. यासाठी पोलीसांनी लोकांना आव्हान केलंय.
रंग उधळून होळी आणि धुलीवंदन सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. पण, या रंगाच्या उत्सवाला गालबोटही अनेकदा लागतं. चालत्या लोकलमधील प्रवाशांना फुगे मारुन त्यांना जखमी केल्याच्या घटनाही घडल्यात. नुकताच मिरारोड- भाईंदरमध्ये एका महिला प्रवाशाला फुगा मारल्यानं दिला गंभीर दुखापत झालीय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी यंदा कंबर कसलीय.
चालत्या ट्रेनवर फुगा फेकू नका... गुन्हा करताना आढळल्यास जेलमध्ये जावं लागेल... प्रवाशांना दुखापत करु नका... असं आवाहन रेल्वे डीसीपी दिपक देवराज यांनी लोकांना केलंय.
फुगे मारण्याचे हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृतीचं काम सुरु केलयं. त्यांनी एक पत्रक तयार केलं असून पोलीस स्वत: हे पत्रक सर्व ठिकाणी वाटताना दिसत आहेत. हे कृत्य करताना कोणी आढळल्यास, ९८३३३३११११ या रेल्वे हेल्पलाईनवर फोन करुन ताबडतोब कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर फुगा मारल्यास कमीत कमी १० वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे आणि यावर्षी अशी काही घटना घडल्यास संबंधीत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल, अशी पोलीस कारवाई करणार आहेत. त्यामुळे फुगे मारणाऱ्यांनो असं काही करु नका ज्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य उध्वस्त होईल आणि त्यामुळे तुम्हालाही जेलची हवा खावी लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.