www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एलबीटीच्या मुद्यावर व्यापारी संघटना आणि राज्य सरकामधला वाद कायम आहे. एलबीटीच्या विरोधात मुंबईतल्य़ा व्यापारी संघटना आक्रमक झाल्यात.
आज मरिनलाईन्स परिसरात व्यापारी संघटनांनी निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. संतप्त व्यापा-यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. व्यापा-यांच्या या आंदोलनामुळे या परिसरातली वाहतूकही विस्कळीत झाली होती.
या प्रकरणी मुंबईसह राज्यातल्या व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारलाय. सरकारला 72 तासांचा अल्टीमेटम दिलाय. किरकोळ व्यापारी संघटनाही बंदमध्ये सहभागी झालीये. व्य़ापारी संघटना आणि राज्य सरकार दोन्ही आपापल्या मुद्यावर ठाम आहेत.
यामुळे आगांमी काळातही हा तिढा कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन दिवसांच्या या संपामुळे सामान्य ग्राहकांचे हाल होण्याची शक्यता आहे.