www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील आरोपी इसाक मोहम्मद हजवाने याचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
१९९३मध्ये मुंबईला हादरवून टाकणाऱ्या बॉम्बस्फोट मालिकेत इसाक याचा हात होता. यामध्ये तो दोषी ठरला होता. सुप्रीम कोर्टाने ८५ वर्षांच्या हजवाणे याची शिक्षा सात वर्षांवरून जन्मठेपेपर्यंत वाढवली होती. तसेच अभिनेता संजय दत्तसह त्यालाही हजर होण्यास चार आठवड्यांची मुदत दिली होती.
टाडा न्यायालयाने त्याला सात वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच त्यात वाढ करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो १७ मे रोजी शरण येणार होता, असे त्याचे वकील फरहाना शाह यांनी सांगितले.
रायगड तालुक्यातील संधेरी येथे राहणाऱ्या हिजवाणे याने शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तसेच, मुंबई बॉम्बस्फोटात वापरण्यात स्फोटकांतील हॅण्ड ग्रेनेडही हजवाणे याच्याकडे सापडले. त्यामुळे टाडा कोर्टाचे न्यायमूर्ती पी. डी कोदे यांनी हजवणे याला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.