मुंबई : मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कोणकोण अर्ज करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. दरम्यान आत्तापर्यंत थांबा आणि वाट बघा असे करणारी भाजप कोर कमिटीने आक्रमक धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
कोर कमिटीने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप चे संख्याबल दोन अपक्ष पकडून 84 आहे. भाजपाला मनसे साथ देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भाजप सेनेला मुंबई महापौरचे पद सहजासहजी मिळवून देणार नाही. यासाठी कंबर कसणार आहे, यासाठी भाजप रणनीति आखत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.