मुंबई : गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणा-या चाकरमान्यांची संख्या वाढतच चाललीय. कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झालंय. सर्वच ट्रेनची वेटिंग लिस्ट थेट 500 पर्यंत पोहचलीय.
यंदा गणेश चतुर्थी 5 सप्टेंबरला आहे.. रेल्वेच्या नियमानुसार 120 दिवस आधी आरक्षण प्रक्रिया सुरु झालीय.. कोकण रेल्वेचं आरक्षण प्रक्रिया सुरु होताच अवघ्या मिनिटांत गाड्या फुल्ल झाल्यात.
3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या काळात धावणा-या कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, राज्यराणी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या सर्व गाड्यांची वेटिंग लिस्ट पाचशेपर्यंत पोहचली आहे. या प्रतिसादामुळं वेटिंग लिस्टही बंद करण्यात आली असून प्रवाशांना तिथं रिग्रेटचा संदेश मिळतोय.
मध्य रेल्वेच्या डबलडेकर एसी एक्स्प्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून या गाडीची वेटिंग लिस्ट 300 पर्यंत पोहचलीय.. हजारो प्रवाशांना तिकीटं मिळाली नसून गणेशोत्सव काळात मध्य आणि कोकण रेल्वेनं गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होतेय.