शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा

मुंबई महापालिका निवडणूक अजून लांब आहे, त्या आधीच शिवसेनेच्या बालेकिल्लात भाजपाने प्रचारची सुरवात केली आहे.

Updated: May 8, 2016, 08:18 PM IST
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा title=

मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक अजून लांब आहे, त्या आधीच शिवसेनेच्या बालेकिल्लात भाजपाने प्रचारची सुरवात केली आहे. सेना भाजपमध्ये वेगवेगळ्या मु्ददा वरून आरोपप्रत्यारोप फेरी झडत असतानाच विधानसभेप्रमाणेच शत प्रतिशत भाजपचा नारा लावला आहे. सेना मनसेचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या लालबाग, शिवडी, परळ भागात भाजपने मुंबईत विकास कामे केलेल्याचा प्रचार सुरू केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलेल्या कामे लोकांना समजावी हीच भूमिका या मागे आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे. पण भाजपच्या या भूमिकेनं शिवसेना नेते मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. 

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच सेना भाजप सत्ताधारी वाद अधिक विकोपाला जाईल असं राजकीय पंडिताच मत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात सरस कोण राहणार याकडे सगळ्याच लक्ष असेल.