मुंबई: जैतापूर अणूउर्जा प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमधील वाद चांगलाच चिघळलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकल्प विरोधी वक्तव्याला महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय.
खडसेंनी ट्विटरवरून शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय. 'कोकणातील जैतापुर येथे अणु ऊर्जा प्रकल्प होणार, ही आमची भूमिका आहे', असं खडसे म्हणालेत.
कोकणातील जैतापुर येथे अणु ऊर्जा प्रकल्प होणार, ही आमची भूमिका आहे.
— Eknath Khadse (@EknathKhadseBJP) May 17, 2015
मुंबईत काल झालेल्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि भूसंपादन विधेयकाला आपला विरोध असल्याचं जाहीर केलं होतं. यालाच खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नुकत्याच झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी जैतापूर प्रकल्प तसंच भूसंपादन विधेयकाबाबत सरकारची नेमकी काय भूमिका आहे त्याचा आढावा घेतला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.