मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, 'जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो', असं धक्कादायक वक्तव्य केलंय.
अॅट्रोसिटी रद्द करू नये, या मागणीसाठी आता दलित समाजही मोर्चे काढणार आहे.
तसंच दलितांच्या मोर्चामागे संघ किंवा भाजप नाही, प्रकाश आंबेडकरांचे यासंदर्भात केलेले आरोप खोडसाळपणाचे असल्याचं आठवलेंनी म्हंटलंय.
अॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मराठा समाजाची मागणी योग्य नाही. मराठ्यांनी कितीही मोर्चे काढले तरी पुढचे ५ वर्षे त्यांचे सरकार येणार नाही, असं आठवले म्हणालेत.
तत्पूर्वी मराठा समाजाचे मोर्चे हे दलितविरोधी नसल्याचं भारीप बहुजनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. जर दलितांचे मराठ्यांच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चे निघाले तर त्यात दलित नसतील, ते भाजप आणि आरएसएसचेच कार्यकर्ते असतील असं, डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.