www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ आहेत. कर्तृत्व असूनही पक्षामध्ये संधी मिळत नाही, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सरकारमध्ये डावललं जातं, अशी माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंची भावना झालीय...
मुख्यमंत्री आणि पक्ष श्रेष्ठींकडून दुर्लक्ष केलं जात असल्यानं ते नाराज झालेत. राणेंची ही अस्वस्थता आता कोणतं रूप घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय... लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुत्र निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर राणेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता. मात्र तो मंजूर झाला नाही.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या कॅबिनेटच्या दोन बैठकांना नारायण राणेंनी दांडी मारली... तर विधान भवनात आज झालेल्या कॅबिनेट बैठकीतून ते उठून निघून गेले... त्यामुळं आक्रमक राणे आता काय राजकीय भूमिका घेणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.