अडवाणींनी पाककडून दाऊदला मागितल्याने आग्रा शांती चर्चा निष्फळ - कसुरी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरू यांनी आग्र्यामध्ये झालेली शांती चर्चा निष्फळ ठरण्याला भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जबाबदार धरले आहे. अडवाणी यांनी दाऊद इब्राहिमला भारताकडे सोपविण्याची मागणी केली होती, त्यामुळे आग्र्यातील शांती बैठक रूळावरून घसरल्याचा खुलासा कसुरी यांनी केला आहे. 

Updated: Oct 15, 2015, 01:27 PM IST
अडवाणींनी पाककडून दाऊदला मागितल्याने आग्रा शांती चर्चा निष्फळ - कसुरी title=

मुंबई : पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरू यांनी आग्र्यामध्ये झालेली शांती चर्चा निष्फळ ठरण्याला भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जबाबदार धरले आहे. अडवाणी यांनी दाऊद इब्राहिमला भारताकडे सोपविण्याची मागणी केली होती, त्यामुळे आग्र्यातील शांती बैठक रूळावरून घसरल्याचा खुलासा कसुरी यांनी केला आहे. 

भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यात चर्चा योग्य मार्गाने सुरू होती. दोन्ही देशात शांतता होती, सीमेवरून वाद मिटण्याच्या अनेक संधी होत्या. पण त्यावेळी भारताचे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी पळून गेलेला दहशतवादी दाऊद इब्राहिम याला भारताला सुपूर्द करण्याची मागणी केली आणि आग्रा शांती बैठकीत मीठाचा खडा टाकला आणि सर्व चर्चा निष्फळ ठरली. 

कसुरू म्हटले की पाकिस्तानच्या न्यायालयात एका पंतप्रधानाला देशातून बाहेर काढण्यात येऊ शकते पण दहशतवाद्यांची गोष्ट ज्यावेळी येते त्यावेळी सुप्रीम कोर्ट लाचार दिसते. पाकचे माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांना बाहेर काढण्यात आले. पण पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांच्या हत्या करणाऱ्यांवर केसही सुरू झाली नाही. 

कसुरी आपल्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी भारतात आले आहे. हे पुस्तक गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये लॉन्च झाले. त्याच्या विरोधात शिवसेनेने हल्लाबोल केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.