रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा - मुंबई उच्च न्यायालय

 येत्या एक वर्षाच्या आत  म्हणजे 31 जुलै 2015 च्या आत मुंबईतल्या सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Updated: Jul 3, 2014, 09:47 AM IST
रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा - मुंबई उच्च न्यायालय title=

मुंबई : येत्या एक वर्षाच्या आत  म्हणजे 31 जुलै 2015 च्या आत मुंबईतल्या सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

घाटकोपर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातल्या गॅपमध्ये पडून मोनिका मोरेला आपले दोन्ही हात गमवावे लागले होते. या प्रकऱणी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश रेल्वे बोर्डाला दिलेत.

रेल्वे बोर्डाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेवरील १४५ आणि मध्य रेल्वेमधील ७२ रेल्वे प्लेटफ़ार्मची उंची वाढवणं गरजेचं आहे. या कामासाठी ९६ कोटी रुपये लागणार असून, तीन वर्षांचा अवधी आवश्यक असल्याचं रेल्वे बोर्डाने म्हटलं होतं. मात्र तीन वर्षांची मुदत न्यायालयाने फेटाळत एका वर्षात उंची वाढवण्याचे आदेश दिलेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.