मुंबई: एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.
हा प्रवासी कर 10 टक्क्यांवर आणला जाणार आहे. एसटीला टोलमुक्त करण्याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे. राज्यात सर्वात फायद्यात असलेल्या मुंबई पुणे एसटीच्या मार्गावर इलेक्ट्रिसिटीनं चार्ज केलेल्या बसेस किंवा इलेक्ट्रिक बसेस चालवण्याबाबत विचार केला जाणार आहे. राज्यातील काही मार्गावर इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस चालवण्यात येणार असल्याचे संकेत परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी दिलेत.
सोमवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागाची मॅरेथॉन बैठक घेतली. विविध विषयांवर चर्चा होताना एसटी महामंडळबाबत प्राथमिक चर्चा झाली. या उपाययोजनांमुळं एसटीची कोट्यवधी रुपयांची रुपयांची बचत होणार आहे. तसंच इंधनवर होणारा खर्चही वाचणार आहे. त्यामुळं एसटीचा तोटा कमी होण्याकडे पावलं टाकली जाणार आहेत.
या उपाययोजनांमुळं एसटीची कोट्यावधी रुपयांची बचत होणार असून इंधनवर होणारा खर्चही वाचणार आहे. त्यामुळं एसटीचा तोटा कमी होण्याकडे पावलं टाकली जाणार आहेत, असं असलं तरी यामुळं प्रवासी भाडं कमी करणार का? असा प्रश्न कायम राहतो. ग्रामीण भागाची लाइफलाइन असलेल्या एसटीची सेवा सुधारण्याकड़े पावले टाकणं गरजेचं आहे.
अस्वच्छतेचे आगार अशी ओळख असलेले एसटीचे आगार किंवा डेपो स्वच्छ होतील का याकडेही सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. थोडक्यात नव्या सरकारकडून एसटीबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.