गणेशोत्सव मंडळांवर अन्याय होऊ देणार नाही : उद्धव

न्यायालयाच्या मनाईनंतर रस्त्यावर मंडप उभारवा का, याबाबत राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर काल शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला. पण गणेशोत्सव मंडळांवर अन्याय होऊ देणार नाही, असं यावेळी उद्धव म्हणालेत.

Updated: Jul 9, 2015, 12:48 PM IST
गणेशोत्सव मंडळांवर अन्याय होऊ देणार नाही : उद्धव title=

मुंबई : न्यायालयाच्या मनाईनंतर रस्त्यावर मंडप उभारवा का, याबाबत राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर काल शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला. पण गणेशोत्सव मंडळांवर अन्याय होऊ देणार नाही, असं यावेळी उद्धव म्हणालेत.

रस्त्यांवर मंडप उभारण्याबाबत न्यायालयाने मनाई केल्याने गणेशोत्सवावरच गंडांतर आले होते. हे विघ्न दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व विघ्ने दूर होऊन गणेशोत्सव परंपरेनुसार जल्लोषात साजरा होईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिले. 

गणेशोत्सवात निर्माण झालेले विघ्न दूर करण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीने उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर व्यथा मांडली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले होते. शिवाय नेमक्या उत्सवाच्या वेळीच या समस्या का समोर य़ेतात. हे कोण घडवून आणतं याचाही तपास करण्याची गरज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली. मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ वाटप आणि अमित शहांच्या भेटीबद्दलही उद्धव ठाकरे  यांनी मौन बाळगलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.