'सलमान गाडी चालवत नव्हता' - सलमानचा ड्रायव्हर

सलमान खानवरील 'हिट ऍण्ड रन' प्रकरणात न्यायालयात झालेल्या सुनावणीत, सलमान खान नव्हे तर मी स्वतः गाडी चालवत होतो, अशी जबाब सलमानचा चालक अशोक सिंग याने दिली. 

Updated: Mar 30, 2015, 06:18 PM IST
'सलमान गाडी चालवत नव्हता' - सलमानचा ड्रायव्हर title=

मुंबई : सलमान खानवरील 'हिट ऍण्ड रन' प्रकरणात न्यायालयात झालेल्या सुनावणीत, सलमान खान नव्हे तर मी स्वतः गाडी चालवत होतो, अशी जबाब सलमानचा चालक अशोक सिंग याने दिली. 

वांद्रे येथे २००२ साली घडलेल्या 'हिट अँड रन' प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे.

या प्रकरणी सलमानचा चालक अशोक सिंग याची साक्ष घेण्यात आली. सन २००२ साली घडलेल्या या अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले होते. 

'अपघात झाला त्यावेळी मी गाडी चालवत होतो. पोलिसांनाही अशाच प्रकारे जबाब दिला होता, मात्र ते आपले काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते.' असं साक्षीदरम्यान अशोक सिंगने म्हटलं आहे.

दरम्यान सिंग यांच्या या कबुलीमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची चिन्हे असून, सलमानला दिलासा मिळू शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.