पाहा, नेमकं काय बोलणं झालं... संदीप देशपांडे आणि महापौरांमध्ये!

 महापौर विशेष विकासनिधी म्हणून १०० कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला जातो. मात्र, महापौरांनी निधीवाटपासाठी नगरसेवक आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याचा आरोप मनसेने केला. याबद्दलच मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांचा काय संवाद झाला....तो जसाच्या तसा...  

Updated: Mar 30, 2015, 02:14 PM IST
पाहा, नेमकं काय बोलणं झालं... संदीप देशपांडे आणि महापौरांमध्ये! title=

मुंबई : महापौर विशेष विकासनिधी म्हणून १०० कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला जातो. मात्र, महापौरांनी निधीवाटपासाठी नगरसेवक आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याचा आरोप मनसेने केला. याबद्दलच मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांचा काय संवाद झाला....तो जसाच्या तसा...  

(महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडून संदीप देशपांडेंना फोन...)
महापौर : हॅलो जय महाराष्ट्र

संदीप देशपांडे : हा जय महाराष्ट्र मॅडम बोला...

महापौर : बरं,आता मी फायनल करतेय, म्हणून म्हटलं एकदा परत एकदा विचारावं... काय करायचं... आपण विचार केलाय सगळ्यांना खूश करायचं... कारण किती सगळा विचार केला तरी ते बाकीकडून येणार ते येणारच... हे करून... हो ना? आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअलही येऊन गेले आहेत... कारण मी आता तुला दोन बोलले होते ना, पक्षासाठी... म आता फायनल बोलते, तीन देते पक्षाला...

संदीप देशपांडे : नको मॅडम, नको... तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या... 

महापौर : नाही... बाकीचे सगळे पक्ष तुझ्या भरवशावर राहिलेत ना... इतरांचे सगळ्यांचे लेटर आलेत 

संदीप देशपांडे : त्यांचे सगळ्यांचे लेटर तुम्हाला देतो, तुम्हाला वाटल तसं करा मॅडम.

महापौर :  नाय नाय, पण ऐक ना मी काय म्हणते, इतर लोकांचीही लेटर्स आलेली आहेत. पण ते केवळ तुझ्या शब्दाखातर बोलले नसतील, माझ्याशी..

संदीप देशपांडे : आता तुम्ही मामांचं (दिलीप लांडे, मनसे नगरसेवक, कुर्ला ) ऑलरेडी केलाय ना?

महापौर : मामांचं नंतर... ही पण आहे... वैष्णवी सरफरे (मनसे नगरसेविका, भांडुप) आहे. हीच पण मला वाटतं आलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट थ्रू आलेलं आहे वाटतं. तीच तीचं कामकडे आहे. तीचं लेटरपण आहे म्हणजे आणि मामांचं आहे. म कसं काय काय करू म?

संदीप देशपांडे : अजून कुणाचे आलेत लेटर डायरेक्ट? 

महापौर : लेटर... आता त्यांच्यावर कारवाई करायचं टेन्शन येतं बाबा (हासण्याचा आवाज)  

संदीप देशपांडे : आता मी कशाला कारवाई करू, (महापौरांचा हसण्याचा आवाज) लेटर तर सगळ्यांनाच दिलेत ना मॅडम... 

महापौर : हो लेटर सगळेच... तसंच झालंय... तर म काय करू असं?

संदीप देशपांडे : मी तुम्हाला करू मॅडम दोन मिनिटांत फोन?  

महापौर : हो चालेल... चालेल 

फोन कट झाल्यानंतर पुन्हा काही वेळाने संदीप देशपांडेकडून महापौरांना फोन... एक व्यक्ती महापौरांना फोन ट्रान्सफर करतो...  

महापौर : हॅलो बोला 

संदीप देशपांडे : मॅडम, तुम्ही मामांना तीन आणि हिला ६ दिलेत ना, वैष्णवीला? 

महापौर : अं... नाही... ६ नाही दिलेलं... एक मिनिट हं जरा (महापौरांची दुसरीकडे विचारपूस - सरपरेला किती दिले, मामांना किती आणि सरफरेला किती दिले असं विचारत आहेत. काय गरज नाही ना सांगायची?) थोडा वेळ थांबून — हॅलो... सरफरेला दोन आहेत.

संदीप देशपांडे : दोन आहेत काय? म माझं म्हणणं होतं की, तुम्ही... मला काय वाटलं, पेपरमध्ये मी सहा वाचलेलं. त्यामुळे मला वाटलं की सहा दिलं.  

महापौर : पेपरमध्ये ते चुकीचं आहे. नोटिफिकेशन नाही, काय नाही... नाना नवरे पाच, सईदा खानला सहा.. हाहाहा... काय वेड लागलंय का? (हसण्याचा आवाज). ते सगळं चुकीचं आहे. त्याबद्दल मी लिहिते पण आहे लेटर... की नोटिफिकेशनच्या आधी तुम्ही कसं काय लिस्ट डिक्लेर करता चुकिची माहिती. खोटी. तर ते मी लेटर लिहिलंय आता संपादकांना खुलासा करण्यात यावा...कशी माहिती घेतली ती. 

संदीप देशपांडे : मॅडम म तुम्ही वैष्णवीला दोन, मामांना तीन - ५ दिलेत काय?

महापौर : हां  

संदीप देशपांडे : म आम्हाला पाच द्या, एकूण दहा करा. आणि सगळ्यांना इक्वल डिस्ट्र्युबुट करून टाका

महापौर : नाय नाय पाच होत नाय ना. 

संदीप : आं... मॅडम तुम्ही आता समाजवादीला किती दिलेत? समाजवादीचे ९ नगरसेवक, आणि माझे २८ नगरसेवक आहेत मॅडम...

महापौर : नाय नाय तरी पण त्या दिवशी मी बोलत होती ना...आता त्यानंतर एवढ्या घडामोडी झाल्या. प्रोजेक्टसाठी पण त्यांनी मागितले ना माझ्याक़डे.. ज्येष्ठ नागरिकांसाठी मागितलंय. नंतर..ते देशमुखसाहेबपण कायतर म्हणतायेत. मॉडियर लॅबसाठी..असं झालेलं आहे. म्हणून म्हणते चार तर करतेच ना..बघा ना..पुढे मागे आहोत आपण करूया..

संदीप देशपांडे : पाच करा मॅडम, आता जाऊंदे..पाच करा

महापौर : अहो काय,, कुठे उरेल कुठे, माझ्याकडे काय 

संदीप देशपांडे  : उरेल हो मॅडम, उरेल..पाच करा. 

महापौर : कुठे उरेल..आता एवढं आपल्याला रिलेशन चांगलं ठेवायचंय, म्हणून मी स्वत: पुढाकार घेऊन करतेय.

संदीप देशपांडे : हो ना मॅडम, मी कुठे नाही म्हटलं. पाच करा पण सगळ्यांना इक्वल डिस्ट्र्युबुट करा. म्हणजे ते मामाला जास्ती, वैष्णवीला दोन असं करू नका.

महापौर : नाय नाय, ते वेगळा इश्यु आहे ना.

संदीप  देशपांडे : नाय म तसं नका करू मॅडम, माझ्या अंगावर येईल सगळं. म मला देऊच नका तुम्ही, जे केलंय ते करून ठेवा. 

महापौर :  नाय नाय, ते त्यांना द्यायचं नाही ना तुम्ही. त्याच्यामध्ये ते दोघेच येतील. 

संदीप देशपांडे : नाय ते मॅडम... म ते हे होतं की... म त्यांना असं वाटेल की... म ते आमच्या  पक्षात प्रॉब्लेम होईल.

महापौर : नाय... बाकीच्या सगळ्यांनी तसंच केलेलं आहे. सगळ्यांकडून तसंच आलेलं आहे. 

संदीप देशपांडे : सगळ्यांची गोष्ट वेगळी पडते ना मॅडम आणि आमची वेगळी पडते. नको म तुम्ही एक काम करा, तुम्ही जे टाकलाय ते टाकून द्या. मला नको वेगळा... 

महापौर : म बाकीच्यांचं नुकसान होईल ना 

संदीप देशपांडे : होऊ दे ना... मी ते करीन... सायबांना सांगेन मी काय सांगायचं ते... 

महापौर : बरं ठीक आहे. ओके... 

(फोन कट होतो)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.